भुसावळ –
तालुक्यातील साकेगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना रविवार, 13 जून रोजी रात्री उशिराने घडली.
या हाणामारीत निलेश बळीराम सोनवणे 36, राहणार साकेगाव हा जखमी झाला होता व दोन्ही गटात परस्परांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाले होते.
दरम्यान जखमी झालेल्या निलेश बळीराम सोनवणे यांचा सोमवार रोजी उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याने साकेगावात शोककळा पसरली.
या प्रकरणी आरोपींच्या अटकेसाठी अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन
दरम्यान, गुन्ह्यातील संशयीत आरोपींना अटक करावी या मागणीसाठी मंगळवारी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देण्यात आले. अटक न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नातेवाईक उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनात दिला असून निवेदनावर अनिता सोनवणे, ललित सोनवणे, बळीराम सोनवणे, वर्षा सोनवणे, यामिनी सोनवणे, जगन्नाथ सोनवणे, मयुर सोनवणे, एकनाथ सोनवणे, तुषार सोनवणे, अर्जून सोनवणे, योगेश सोनवणे, सुरेश कोळी, रमेश काळी, मधुकर कोळी, किशोर कोळी, कैलास कोळी, पवन मोरे, मुकेश सानवणे, नामदेव सपकाळे यांच्या स्वाक्षर्या आहेत.



