वरणगाव –
शहराला भाजपाच्या सरकारने मंजुर केलेल्या पंचवीस कोटीची पाणी पुरवठा योजेनेचे काम त्वरीत सुरू करण्याच्या मागणी साठी अनेक आदोलन केल्या नंतर अखेर कामाचे .आमदार संजय सावकारे यांचे हस्ते भुमीपुजन करण्यात आले
शहराचा वाढता विस्ताराने माजी नगराध्यक्ष सुनिल काळे व त्यांच्या सहकारी नगर सेवकानी तंतकालीन मुख्यमंत्री दैवेद्र फङवणीस व जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांच्या कडून २४X ७ ची पंचवीस कोटीची योजना मंजुर करण्यात आली होती मात्र त्यावेळेचे भाजपा सरकार राज्यातून गेल्या नंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्या नंतर सर्वच कामाला स्थगिती देण्यात आली होती व काही तांत्रीक अडचणी मुळे या कामाच्या ठेकेदारास कार्यदेश देण्यास उशीर झाल्याने काळे यांनी सात ते आठ वेळा या साठी वेगवेगळे आदोलन करीत या पाणी पुरवठा योचनेचे काम सुरू करण्याची मागणी केली होती असेच दि १९ रोजी शहर महिला आघाडीच्या वतीने नगर परिषद कार्यालया समोर ठिय्या आदोलन करून या योजनेचे काम जलद गतीने सुरू करण्याची मागणी केल्याने अखेर आज दि २१ सोमवार रोजी या पाणी पुरवठा योजनेचे कामाचे भुमीपुजन आमदार संजय सावकारे हस्ते करण्यात आले
यावेळी प्रांतधिकारी रामसिग सुलाने ,मुख्याधिकारी समीर शेख , शे अखलाक शे युसुफ , माला मेढे , रुख्मीणी काळे , प्रणीता चौधरी , सुनिल माळी , अल्लाउद्दीन शेठ, इरफान पिंजारी , ए जी जजांळे , कृष्णा माळी , श्यामराव धनगर , प्रविण चांदणे , गजानन वंजारी , भाऊलाल टिटोरे , संगीता माळी , जयश्री अवतारे , आदी उपस्थीत होते



