भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ रेल्वे विभागातर्फे रेल्वे स्कूल येथे शनिवार १९ जून रोजी
हास्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
योग दिनाच्या अनुषंघाने रेल्वे बोर्ड द्वारा मिळालेल्या आदेशा नुसार विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या अंतर्गत भुसावळ येथील हास्य गुरू मुंसफ अली सय्यद यांनी हास्य योगाचे प्रात्यक्षिक दिले. तसेच हास्य योग आसन आणि हास्य योगाचे आजच्या कोरोना संक्रमण काळातील महत्व विषद केले तसेच संपूर्ण कार्यक्रमात ऑनलाईनच्या माध्यमातून रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चेहेऱ्यावर हास्य फुलविले. विवेक कुमार गुप्ता मंडळ रेल प्रबंधक यांनी या प्रसंगी संबोधन आणि मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार सतीश कुलकर्णी प्राचार्य रेल्वे स्कूल आणि एस के उपाध्याय ग्रंथपाल यांनी केले.
ऑनलाईन माध्यमातून ह्या कार्यक्रमात विवेक कुमार गुप्ता मंडळ रेल्वे प्रबंधक, मनोजकुमार सिन्हा अप्पर मंडल रेल प्रबंधक,एन डी गांगुर्डे वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी ,दिलीप खरात मंडळ कार्मिक अधिकारी तसेच सर्व शाखाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साठी देवेंद्र विश्वकर्मा डी बी ए, कार्मिक विभागातील कर्मचारी तसेच रेल्वे स्कूल मधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



