भुसावळ नगरपालिकेवर भगवा फडकणार: माजी आमदार दिलीप भोळे ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
जनसेवेच्या माध्यमातून नागरिकांची कामे करा, निवडणुकीत भुसावळ नगरपालिकेवर भगवा नक्की फडकणार आहे कारण शिवसैनिकांनी कोरोना काळात सुद्धा जीवाची पर्वा न करता जनसेवेची कामे सुरूच ठेवली आहे. जनता काम करणाऱ्याला विसरत नाही, त्यामुळे शिवसेनेचे येणाऱ्या निवडणुकीत २० पेक्षा जास्त नगरसेवक सभागृहात राहतील. सर्वांनी एकजुटीने कामाला लागा असा सल्ला शिवसेना वर्धपान दिनानिमित्त शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी आयोजित केलेल्या जनसेवा अभियानांतर्गत शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना माजी आमदार दिलीप भोळे यांनी दिला.
जिल्हाप्रमुख समाधान महाजन, माजी आमदार दिलीप भोळे, उपजिल्हा संघटक विलास मुळे, कार्यलयीन उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, माजी तालुकाप्रमुख निळकंठ फालक, उपतालुका प्रमुख पप्पू बारसे, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, शेख एलियास, माजी नगरसेवक दीपक धांडे, देवेंद्र पाटील, मनोज पवार, शेख मेहमूद व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तरुण कार्यकर्त्यांची फळी लाभदायक: समाधान महाजन
शिवसेनेत तरुण कार्यकर्त्यांची फळी जोरदार काम करीत आहे. शिवसेनेतर्फे कोरोना काळात अनेक आरोग्यविषयक कार्ये केली गेली. आता जनसेवा अभियानात नागरीकांच्या हक्कांची पुरता करण्याचे प्रयत्न बबलू बऱ्हाटे यांनी सुरू केले असून या अभियानाला जिल्हाभर व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करू असे जिल्हाप्रमुख समाधान महाजन म्हणाले.
जनसेवा अभियानाचे कौतुक: निळकंठ फालक
जनसेवा अभियानाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्या कार्याची पावती आहे असं म्हणून माजी तालुका प्रमुख निळकंठ फालक यांनी जनसेवा अभियानाचे कौतुक केले.
शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढला: प्रा.उत्तम सुरवाडे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी संयमाने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यवाही केली. जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक तालुके कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. तर आज भुसावळात 0 रुग्ण आहेत. उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीमुळे शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढला आहे असे उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे म्हणाले.
२०० नागरिकांनी अभियानात सहभाग नोंदवला. नवीन रेशनकार्ड नोंदणी, रेशनकार्डात नाव वाढवणे, नवीन मतदान कार्ड नोंदणी, संजय गांधी निराधार योजना, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, नॅशनलिटी, डोमेसाईल दाखला व शासनाचे इतर दाखले व सोयी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *