भुसावळ तालुक्यात शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्याकडून २६ शाळांना प्रिंटर वाटप ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) –
शैक्षणिक संस्था ,विनाअनुदानित संस्था, शिक्षक यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत.शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्या सहकार्याने या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.अनेकदा मंत्री महोदय निवारण करायला तयार असतात मात्र अधिकारीवर्ग योग्य ती दिशा देत नाही. त्यामुळे विलंब होत असतो.आर्थिक बाबत शासनाला देखील मर्यादा आहेत.मात्र तरीही शिक्षक,पदवीधर आमदार यांच्या सहकार्याने आपल्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहेत.असे मत शिक्षक नेते संभाजी पाटील यांनी व्यक्त केले.
येथील डी एस हायस्कूल मध्ये भुसावळ तालुक्यातील 26 शाळांना शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रिंटर वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.व्यासपीठावर याप्रसंगी नगरपालिका शिक्षण समितीचे चेअरमन मुकेश गुंजाळ ,आमदार दराडे यांचे स्वीय सहाय्यक हरीश मुंडे ,आमदार दराडे यांचे प्रतिनिधी घोरपडे सर ,आवटे सर, प्राचार्य एम टी सपकाळे ,भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.पी.सपकाळे, किन्ही हायस्कूल चे मुख्याध्यापक डी.पी.साळुंखे , मुख्याध्यापिका सुरेखा पाटील ,मुख्याध्यापक नितीन किरंगे, मुख्याध्यापिका संगीता राणे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ललित फिरके, बी एन पाटील व द . शि.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.मान्यवरांच्या हस्ते 26 शाळांच्या आलेल्या प्रतिनिधींना प्रिंटर वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सीमा भारंबे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *