तिसर्‍या अपत्याचा फटका : वराडसीम सरपंच अपात्र –


भुसावळ –

तिसरे अपत्य प्रकरणी वराडसीम सरपंच गीता प्रशांत खाचणे यांना अपर आयुक्त भानुदास पालवे यांनी अपात्र ठरवले. वराडसीम येथील अलका जानकीराम सपकाळे यांनी वराडसीम सरपंच गीता खाचणे यांना तीन अपत्य असल्याने त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. सपकाळे यांनी खाचणे यांना तीन अपत्य असल्याबाबत पुरावे सादर केल्यानंतर या प्रकरणी अपर आयुक्तांकडे सुनावणी झाली. सपकाळे यांच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने खाचणे यांना पदावरून अपात्र करण्याबाबतचे आदेश नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचे गटविकास अधिकारी राजेंद्र देसले यांनी काढल्े आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *