ना. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेची जळगाव जिल्हा महिला आघाडी संघटित ; भुसावळच्या राजश्री नेवे यांची जिल्हाप्रमुख पदी तर उपप्रमुखपदी माया चौधरीं यांची नियुक्ति ;

प्रहार संघटनेची जळगाव जिल्हा महिला आघाडी संघटित ; भुसावळच्या राजश्री नेवे यांची जिल्हाप्रमुख पदी तर उपप्रमुखपदी माया चौधरीं यांची नियुक्ति ;
भुसावळ –
प्रहार जनशक्ती पक्ष संलग्नित प्रहार शैक्षणिक,सामाजिक व बहुउद्देशिय
संघटनेची नुकतीच
जिल्हा महिला आघाडी संगठित झाली असून यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदी येथील सखी श्रावणी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्ष सौ राजश्री नेवे यांची संघटनेच्या जळगाव जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदी तर उपप्रमुखपदी सौ माया चौधरीं यांची नुकतीच नियुक्ति झाली आहे . याबाबत आमदार बच्चू कडू यांनी नियुक्ति पत्र देऊन अभिनंदन केले आहे .
प्रहार संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीत सौ.अनुराधा दिलिपकुमार टाक (सरचिटणीस)
सौ.वंदना लिलाधर झांबरे : (खजिनदार ), सौ.स्मिता आकाश माहुरकर ( जिल्हा संघटक )
सौ.कामिनी शशिकांत नेवे (प्रसिद्धी प्रमुख ), सौ.भाग्यश्री किशोर नेवे ( उपाध्यक्षा ) यांचाही समावेश आहे .
सौ नेवे यांच्या शैक्षणिक,सामाजिक व बहुउद्देशीय कार्याची व चळवळीतील योगदानाचा विचार करुन करण्यात आली असून एक वर्ष कालावधिकारीता आहे .
संघटनेच्या ध्येयधोरणासह कटिबद्ध असून आपल्या पदाची प्रमाणिक वाटचाल करून संघटनेची व संघटनेचे प्रेरणास्थान शालेय शिक्षण राज्यमंत्री, बच्चुभाऊ कडू यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवणाऱ असल्याचा विश्वास यावेळी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष यांनी व्यक्त केला तसेच वेळोवेळी संघटनेतील वरिष्ठ पदाधिकारी यांच्या आदेशानुसार व धोरणानुसार कार्य करणार असून
शिक्षण,तसेच सामाजिक क्षेत्रातील ज्वलंत समस्यांना न्याय मिळवून देण्याकरीता वेळोवेळी प्रयत्न करणार आहे वरिष्ठांच्या पूर्व सूचनांची व मार्गदर्शनाप्रमाणे कार्य करणार असल्याची भूमिका मांडली . संघटनेच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष व सदस्यांना शुभेच्छा देवून अभिनंदन करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *