वरणगावला जुन्या वादातून तरुणाचा खुन चौघ संशयीताना अटक ; चार दिवसाची पोलीस कोठडी ;

वरणगाव –
शहरातील डॉ बाबासाहेब आबेडकर नगर मधील रहिवाशी असलेल्या तरुणामध्ये मगील सहा महिन्यापुर्वी वाढदिवसाच्या कार्यक्रमात झालेल्या वादाची कुरापत काढून नव्याने वाद करीत चौघानी धारदार शस्त्राने अंगावर आठ ते दहा वार करून तरूणाचा खुन केल्याची घटना सोमवारच्या रात्री १० .३० वाजेच्या सुमारास घडली असुन घटनेतील चौघा संशयीत मारेकऱ्याना रात्रीच पोलीसानी अटक करण्यात आली दरम्यान आरोपिना भुसावळ न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
या बाबत पोलीसानी दिलेल्या माहीतीनुसार असे की शहरातील मुख्य रस्त्यावरील डॉ बाबासाहेब आबेडकर नगर मधील रहिवाशी सचिन भिवराव मगरे ( २८ ) नगर परिषदेच्या घंटा गाडीवर रोजदारी वरील काम करणारा तरुण सचिन भिवराव मगरे ( २५ ) हा सहा महिन्या पुर्वी याच परिसरातील रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीच्या लहान नातीच्या वाढदिवसात नाचताना धक्का लागल्याने त्याचा राग आल्याने सचिनला मनोज तायडे , अजय तायडे , तुषार तायडे अशानी त्यावेळी लाथा बुक्यानी मारहाण केली होती मात्र तेव्हा सुद्धा काहीनी मध्यस्थी करूण भाडण मिटवीले होते नंतर थोड्याच दिवसानी पुन्हा याच्यात वाद झाला होता तेव्हाही सचिनला भोगावती नदी पात्रात ढकलण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा हे भाडण शांत करण्यात आले होते मात्र सोमवार च्या रात्री दहा वाजेच्या सुमारास आपल्या मोटर सायकलीने घरी जात असताना रोहीत किशोर तायडे , अजय रविद्र तायडे , राहुल गजानन कदम , अक्षय संजय भैसे यांनी डॉ बाबा साहेब आबेडकर पुतळ्याच्या मागच्चा बाजुस असलेल्या महालक्ष्मी सॉमील च्या प्रवेशद्वारा समोर यांच्यात पुन्हा वाद झाला व तो विकोपाला गेल्याने हणामारी झाली मात्र वांरवार आडवा हा येत असल्याने एकाने धारधार शस्त्राचा वापर करीत सचिनच्या मानेवर, डोक्यावर , छातीवर , पोटावर , पाठीवर असे सपासप वार करीत त्याला रक्ताच्या थरोळ्यात पाडले ही घटना घडत असताना ओरडण्याचा आवाज आल्याने थोडयाच अतंरावर उभा असलेला सचिनचा मोठा भाऊ भिवराज जिवराव मगरे हा कोणाचे भांडण आहे पाहण्यासाठी धावत त्या ठिकाणी पोहचल्याने लक्षात आले की आपल्या लहान भावास मारत असल्याने त्याने मारेकऱ्याल माझ्या भावास मारू नका असे विनवनी केल्या नतंर मारेकरी हे प्रतिभा नगरच्या दिशेने पळून गेले होते रक्ताच्या थरोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत भाऊ ने सचिनला उचलून उपचारा साठी ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेला असता त्याला डॉक्टरानी मृत घोषीत केले
घटनेची माहीती मिळताच वरणगाव पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरिक्षक संदिप कुमार बोरसे , उप सह पोलीस सुनिल वाणी , नागेद्र तायडे , गणेश शेळके याचे सहकाऱ्यानी घटना स्थळी धाव घटनेचा पंचनामा करीत ठस्से तज्ञास पाचरण केले करीत मारेकऱ्याचा शोध घेण्यास रवाना होऊन पाच तासाच्या आत चार सशयीत रोहीत तायडे , अजय तायडे , राहुल कदम , अक्षय भैसे याना जोरबंद केले
या बाबत मयत सचिनचा भाऊ भिमराज जिवराव मगरे यांच्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलीस स्टेशना संशयीत आरोपी विरोधात भा द वी कलम ३०२ , ३२३ , ५०४ , ३४ आर्म अॅक्ट ४ / २५ प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सह पोलीस निरिक्षक संदिपकुमार बोरसे हे करीत आहे
दरम्यान चौघा संशयीत आरोपीना भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्याना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *