मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक 01221/01222 मुंबई -हजरत निजामुद्दीन राजधानी विशेषची वारंवारीता द्वि-साप्ताहिक वरून आठवड्यातून चार दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. पुनर्संचयित तपशील पुढे दिलेल्यानुसार:
ट्रेन क्रमांक 01221 मुंबई -हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष दि. ११.६.२०२१ पासून सूचना मिळेपर्यंत मंगलवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी म्हणजेच आठवड्यातून चार दिवस चालविण्यात येईल.
ट्रेन क्रमांक 01222 हजरत निजामुद्दीन मुंबई राजधानी विशेष दि. १२.६.२०२१ पासून सूचना मिळेपर्यंत बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी म्हणजेच आठवड्यातून चार दिवस चालविण्यात येईल.
आरक्षण : पूर्णतः आरक्षित 01221 या विशेष ट्रेनच्या पुनर्संचयित फे-यांचे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर आधीच सुरू करण्यात आलेले आहे.
तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
प्रवाशांना विनंती आहे की कृपया याची नोंद घ्यावी.



