वरणगावला जुन्या वादातुन तरुणाचा खुन ;दोघा संशयीताना अटक ;

वरणगाव –
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून चौघांनी 25 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शहरातील आंबेडकर नगरात सोमवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास महालक्ष्मी सॉल मिलजवळ घडली. या हल्ल्यात सचिन जीवराम मगरे (25, आंबेडकर नगर, वरणगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुल गजानन कदम (24) व अक्षय संजय भैसे (23) यांना अटक करण्यात आली.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात वाद झाल्यानंतर मयत सचिन मगरे व फिर्यादी भीमराज जीवराम मगरे (27, आंबेडकर नगर, वरणगाव) यांच्या वाद झाल्यानंतर त्यावेळी दोघा भावंडांना आरोपींनी टोकदार शस्त्राने मारहाण करीत शिवीगाळ केली होती व पुन्हा याच कारणावरून सोमवारी रात्री डॉ.आंबेडकर नगराजवळील महालक्ष्मी सॉल मिलजवळ आरोपींनी सचिन मगरे यास धारदार शस्त्र मारल्याने सचिनचा मृत्यू झाला. दरम्यान, खुनाची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड, सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *