साकेगावातील दहा दिवसांपासून बंद स्ट्रीट लाइट त्वरित सुरू करावे ग्रामपंचायत प्रशासनाचे आमदार संजय सावकारे यांना निवेदन ;


भुसावळ –
तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीची गेल्या दहा दिवसांपासून थकित बिला पोटी स्ट्रीट लाईट बंद असून ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये आज पर्यंत स्ट्रीट लाईटचे बिल जिल्हा परिषद प्रशासन भरीत होते
ऊर्जा विभागाच्या शासन निर्णय 16 मे 2018 नुसार ग्रामपंचायत हद्दीतील 31 मार्च 2018 पर्यंत विस्थापित पोल वरील पुढील स्ट्रीट लाईट चे बिल महाराष्ट्र शासनाने भरणे अनिवार्य असल्याचे निर्णयात नमूद असल्याने सरकारने त्वरित बिल भरावे व गावातील बंद स्ट्रीट लाईट त्वरित सुरू करण्यासाठी आमदार संजय सावकारे यांना ग्रामपंचायत कमिटीने निवेदन दिलेले आहे .
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत हद्दीतील स्ट्रीट लाईट चे बिल जिल्हा परिषद प्रशासन वित्त आयोग आठवा विविध अनुदानातून कपातीच्या माध्यमातून स्टेट लाईट चे बिल भरण्यात येत होते मात्र महाराष्ट्र शासनाच्या उद्योग उर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय 16 मे 2018 नुसार मुद्दा क्रमांक चार मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे ग्रामपंचायत हद्दीतील ३१ मार्च 2018 पूर्वी जे पथदिवे ग्रामपंचायत भागात आहेत त्या पथदिव्यांची पुढील वीज देयकाची रक्कम ग्रामविकास विभागानेमहावितरण कंपनी कडे शासन अनुदान किंवा वित्त आयोगाच्या अनुदानातून भरणा करावी तसेच दिनांक 31 मार्च 2018नंतरच्या स्थापित झालेल्या पथदिव्यांच्या वीज देयकांची रक्कम संबंधित ग्रामपंचायत कडून महावितरण कंपनीस अदा करावी नवीन पथदिवे करता वेगळे मीटर लावण्यात यावे असे स्पष्ट निर्देश शासन निर्णयात दिलेले आहे मात्र यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आज पर्यंत गावातील पथदिव्यांचे बिल न भरल्याने तसेच गावातील एकाने तक्रार दाखल केल्यामुळे ग्रामपंचायतीचे पथदिवे गेल्या दहा दिवसांपासून बंद आहेत यासंदर्भात साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित जीआरचा अभ्यास करून गट विकास अधिकारी तथा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांना निवेदनाद्वारे द्वारे महाराष्ट्र शासनाने त्वरित महावितरण कडे थकित बिल त्वरित भरून गावातील पथदिव्यांचा बंद वीज पुरवठा त्वरित सुरू करावा अशी मागणी प्रभारी सरपंच आनंद ठाकरे , सरपंच पती विष्णू सोनवणे ,माजी सरपंच सुरेश पाटील ,समाज सेवक सुभाष कोळी , ग्रामपंचायत सदस्य कुंदन कोळी, पप्पू राजपूत, सागर सोनवाल ,गजानन पवार , सुभाष सोनवणे ,गजानन कोळी ,आदींची उपस्थिती होती

गावातील विरोधकांनी पाण्यात व वीज पुरवठ्यात तसेच विकासात्मक कामात आडकाठी निर्माण करून ग्रामस्थांची दिशाभूल करून राजकारण करू नये असे आवाहन साकेगाव स्मार्ट विलेज ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच आनंद ठाकरे यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *