मुक्ताईनगर –
सद्या देश व राज्य कोरोना संसर्गाच्या संकटातून निघण्याचे नाव घेत नाही आहे त्यातच प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वेळोवेळी करण्यात येणारे लॉकडाऊन तसेच निसर्गाचे वादळी तडाके व अवकाळी चा फटका या दुष्टचक्रातून बळीराजा सावरलेला नाही यंदा या संकटावर मात करण्याचा प्रयत्न म्हणून खरीप हंगामाचे पेरणीचे दिवस सुरू असल्याने शेतकरी वर्ग हात उसनवारी, महागडे सावकारी कर्ज उचलून, घरातील महिलांचे दागिने विकून शेतीच्या मशागती पासून ते पेरणी पर्यंत आर्थिक बोजा खाली पूर्ण दाबला जात आहे अशात ट्रांसफार्मर जळाले की महावितरण तर्फे दोन ते तीन बिलांची वसुलीसाठी सक्ती केली जात आहे तसेच सक्तीच्या वसुली पोटी कृषी पंपांची वीज तोडणी करण्याचा संतापजनक प्रकार महावितरणने सुरू केलेला आहे या सुलतानी कारभाराच्या निषेधार्थ व हा प्रकार तात्काळ थांबविण्यात यावा या मागणीसाठी आज दिनांक 8 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता मुक्ताईनगर येथे प्रवर्तन चौकात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतर्फे प्रचंड रास्तारोको व निदर्शने आंदोलन करण्यात आले.

तब्बल एक तास चालले रास्ता रोको आंदोलन
दरम्यान प्रचंड रास्ता रोको आंदोलन सुरू असताना शिवसेनेतर्फे महावितरण विभागाच्या गलथान व सुलतानी कारभार निषेधार्थ प्रचंड निदर्शन व घोषणा बाजी करून सुमारे एक तास हे आंदोलन सुरू होते .आंदोलन स्थळी तहसिलदार श्वेता संचेती, महावितरण चे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी निवेदन स्विकारल्यानंतर सुरू असलेले आंदोलन थांबले .या ठिकाणी पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार ,उपनिरीक्षक निलेश सोळुंके , परविन तडवी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.
आंदोलनात यांचा सहभाग:
तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील , जिल्हा नियोजन समिती सदस्य मनोहर खैरनार , अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, नवनीत पाटील, जिवराम कोळी, शिवाजी पाटील , महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सुषमाताई शिरसाट ,शिवसेना शहर प्रमुख गणेश टोंगे, गटनेता राजेंद्र हिवराळे, शहर संघटक वसंत भलभले , नगरसेवक संतोष मराठे , नगरसेवक मुकेशचंद्र वानखेडे, नगरसेवक पियुष मोरे, नगरसेवक आरिफ आजाद, नगरसेवक संतोष उर्फ बबलू कोळी, नगरसेवक युनूस खान, मुक्ताईनगर माजी सरपंच रामभाऊ पूनासे, चांगदेव माजी सरपंच पंकज कोळी, वायला माजी सरपंच प्रमोद कोळी, भागवत कोळी (नायगाव), गुलाबराव पाटील (पूरनाड) , देवानंद वंजारी , राजेंद्र तळेले, सचिन (पिंटू) पाटील, आकाश सापधरे, संतोष माळी, मनोज मराठे, सलीम खान, माजी उपसरपंच जाफर अली, माजी उपसरपंच मुशीर मणियार, शकूर जमदार , जीवन पवार, सुधीर कुलकर्णी, मोहन बेलदार, डॉक्टर रमेश कोळी, कुऱ्हा शहर प्रमुख पंकज पांडव, सतीश नागरे, योगेश पाटील (उचंदा), भागवत कोळी , कैलास डहाके (निमखेडी खु), संचालाल वाघ , गोकुळ पाटील, दीपक पवार ,शेषराव कांडेलकर (निमखेडी बु), राहुल इंगळे (वायला), प्रमोद पाटील (पुरणाड) , माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे, दिलीप पाटील सर, ब्रिजलाल मराठे, रोहिदास शिरसाट, मितेश पाटील, उमेश पाटील (माजी उपसरपंच), किशोर पाटील (महालखेडा) , जी.के पाटील, अनिल तळेले, गणेश पाटील, किरण कोळी, अशोक कुंभार, साबीर शेख, उमेश चव्हाण, शरीफ सय्यद, स्वप्नील श्रीखंडे, चेतन कांडेलकर, जावेद खान (धामणगाव) यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव , शिवसैनिक व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थिती होती.


