निरोगी आयुष्य जगण्यासाठी, कोरोना सारख्या महामारी वर मात करण्यासाठी झाडे लावावीत – डी.वाय.एस.पी. सोमनाथ वाघचौरे ;


भुसावळ –
निरोगी आयुष्य जगण्यासाठी व कोरोना सारख्या महामारीवर मात करण्यासाठी झाडे लावावीत असे आवाहन डी.वाय.एस.पी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे .
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलीस विभाग भुसावळ , निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व महिला पर्यावरण सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करताना डी वाय एस पी सोमनाथ वाघचौरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
श्री वाघचौरे यावेळी म्हणाले की , आज कोरोना या महामारीत खूप मोठमोठ्या संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे ही परिस्थिती का निर्माण झाली याचा सुद्धा प्रत्येकाने विचार करायलाच हवा कारण मानवाने मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण केले आहे , मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली , भारतीय देशी वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पर्यावरणात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत गेले . याचा परिणाम विविध कोरोणा सारखे आजार संकट आपल्यावर आले यावर जर आपल्याला मात करायची असेल भविष्यासाठी आपल्या मुले, नातू ,पनतू साठी आपली देशी झाडे लावणे आवश्यक आहे. यात वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, कांचन, निंब असे कितीतरी पर्यावरण पूरक झाडे लावणे आवश्यक आहे असेही सांगीतले.
तर निसर्गप्रेमी तथा तालुक्यांचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी कोणती झाडे कोठे लावायची याचे नियोजन करुन झाडे कशी लावावी हे प्रात्यक्षिकासह दाखविले त्यांनीं अनेक झाडे स्वतः लावून ती अनेक झाडे त्यांनी जगवली आहेत .
यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनीही वृक्ष संदर्भात महिती देवून कमी पाण्यात वृक्ष कसे जगतील यासाठी मडके चा वापर कसा होतो ते सांगून प्रत्यक्ष रोपे सोबत पाणी भरलेले मडकेही बुजवले आहे .
प्रसंगी वयोवृध्द राज्य सल्लागार रघुनाथ आप्पा सोनवणे यांचा माझी वसुंधराचे प्रमाणपत्र देवुन गौरव करण्यात आला.
यावेळी सुरेन्द्रसिंग पाटील, महानंदा ताई पाटील, सौ पाटणकर आदी व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *