उत्सव विशेष ट्रेनच्या सेवांमध्ये वाढ –
भुसावळ –
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुढील उत्सव विशेष गाड्यांची मुदत वाढविण्याचे ठरविले आहे. तपशील पुढे दिल्यानुसार:

१.02198/02197 जबलपूर कोयम्बटूर विशेष –
02198 जबलपूर कोयम्बटूर विशेष सेवा दि. ११.०६.२०२१ ते ३०.०७.२०२१ (८ फे-या) पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत आणि
02197 कोयम्बटूर -जबलपूर विशेष सेवा दि. १४.०६.२०२१ ते ०२.०८.२०२१ (८ फे-या) पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.
उपरोक्त सर्व विशेष सेवा विद्यमान मार्गावर, वेळापत्रकाप्रमाणे आणि थांब्यांसह धावतील.
*तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
*केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
*प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविद-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


