मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांनी इगतपुरी भुसावळ सेक्शनचे केले सेफ्टी निरिक्षण ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे महाव्यवस्थापक
आलोक कंसल यांनी दि. ०१.०६.२०२१ रोजी भुसावळ विभागातील इगतपुरी भुसावळ सेक्शनचे सेफ्टी निरिक्षण केले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक,
विवेक कुमार गुप्ता व अन्य शाखा अधिकारी उपस्थित होते.
श्री कंसल यांनी इगतपुरी -भुसावळ सेक्शनस् मध्ये चालू असलेल्या विविध कामांची पाहणी निरीक्षण यान द्वारे केली. तिसरी आणि चौथी लाईनच्या कामांचा आढावा घेतला . त्यांनी प्रवासी सुविधांशी संबंधित कामांचा आढावा सुद्धा घेतला. त्यांनी यंत्रणेतील सुधारणेच्या मुळ कारणांचे विश्लेषण करण्याचे निर्देश अधिका-यांना दिले. त्यांनी विभागीय अधिका-यांना नियमितपणे पाणी पुरवठ्याची गुणवत्ता तपासण्यासाठी सांगितले.
श्री कंसल यांनी निरिक्षणा नंतर भुसावळ स्थानकांची स्वच्छता , दक्षिण दिशा परिसर , बुकिंग ऑफिस ,आरक्षण केंद्र , गार्डनचे निरीक्षण करण्यात आले . प्लेटफार्म क्र 3 येथे प्रतीक्षालय , वातानुकूलित प्रतीक्षालय , गार्ड आणि लोकोपायलट लॉबी चे निरीक्षण करण्यात आले. मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात शाखा अधिकारी आणि मान्यताप्राप्त संघटना पदाधिकारी सोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
मध्य रेल्वे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी प्रवाशांना योग्यप्रकारे मास्क घालावे , आपले हात साबणाने व पाण्याने स्वच्छ धुण्याचे व कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिग राखण्याचे आवाहन केले आहे .
या निरिक्षणा दरम्यान सर्व कोविड प्रोटोकॉल आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *