वरणगाव –
मुक्ताईनगर येथे भाजपच्या दहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भुसावळ शिवसेनेतर्फे वरणगाव बस स्टॅन्ड चौकात फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला .
याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे , नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे , जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील , व मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय चंद्रकांत पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मुक्ताईनगर येथील दहा नगरसेवकांनी मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी मुंबई येथे उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला .
नामदार गुलाबरावजी पाटील जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री झाल्यापासून त्यांनी जळगाव जिल्ह्यातील विकास कामांचा धडाका सुरु केला तसेच मुक्ताईनगरचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे आमदार झाल्या पासून त्यांनी मुक्ताईनगर मतदार संघात जो आरोग्यसेवे सह विकास कामांचा धडाका लावला कुठलाही भेदभाव न करता हा आपला परका न समजतात ज्या भागात विकास कामांची आवश्यकता आहे त्या त्या भागात तातडीने विकास कामे मंजूर केले व कामांना सुरुवात केली आणि काही कामे पूर्णत्वास नेली मुक्ताईनगर मतदार संघात सध्या सुरू असलेल्या कामांचा धडाका तसेच आरोग्यसेवे बाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेले कार्य यावर प्रेरित होऊन व शिवसेना पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नागरिकांच्या प्रति कामाची तळमळ व आरोग्य सेवा या गोष्टीने प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे भुसावळ तालुका शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या . प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन , उपजिल्हा संघटक विलास मुळे , अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी , उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी , भुसावळ पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे ,अल्पसंख्यांक तालुका संघटक अब्रार खान, अल्पसंख्यांकांचे उपशहर संघटक सय्यद मुजाहिद उपशहर संघटक अमर सोनार ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी ,निलेश ठाकूर , निलेश काळे ,राहुल बावणे ,सागर वंजारी, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते



