भुसावळात उद्या 45 वर्षांवरील नागरीकांना लसीकरण ; कोवॅक्सीन व कोविशील्डच्या 700 लस उपलब्ध : पाच केंद्रावर होणार लसीकरण ;


भुसावळ –
कोरोनाचा एकीकडे थैमान कायम असताना प्रशासनाकडून लसीकरणाला वेग देण्यात आला आहे मात्र मध्यंतरी लस नसल्याने चिंता वाढली असतांना आता गुरुवारी लस उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

गुरुवारी शहरातील पाच केंद्रावर लसीकरण होणार असून कोविशिल्ड व कोवॅक्सीनचे एकूण 700 डोस उपलब्ध झाले आहेत. कोवॅक्सीनचे 100 डोसही उपलब्ध झाल्याने दुसरा डोस रखडल्याने शहरवासीयांना दिलासा मिळेल.
पहिल्या डोससाठी पुढील ठिकाणी गुरुवारी लसीकरण
शहरात नगरपालिका मुख्य दवाखान्यात 150, खडकारोड दवाखान्यात 100, वरणगावरोड प्राथमिक केंद्रात 100, ब्रदीप्लॉट केंद्रात 150 कोविशील्ड या लसीचे डोस उपलब्ध असतील. 45 वर्षावरील नागरीकांसाठी पहिल्या डोसचे लसीकरण या केंद्रांवर होईल

दुसर्‍या डोसचे येथे होणार लसीकरण
कोवॅक्सीन व कोविशील्ड या या लसीचा दुसरा डोसचे लसीकरण महात्मा फुले नगर दवाखाना येथे देण्यात येईल. कोशीशिल्डचे 100 व कोवॅक्सीचे 100 असे 200 डोस उपलब्ध झाले असून सकाळी 9 ते 5 वाजेदरम्यान लसीकरण राबवले जाणार असल्याचे लस साठा संपताच केंद्र बंद होईल, असे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, वैद्यकिय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर कळवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *