जळगाव प्रतिनिधी –
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढत असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. अशातच राज्यात सर्वात कमी पाॅझिटीव्हीटी दरात जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी दर अवघा 3.83 टक्क्यावर आला आहे. दरम्यान, राज्यात भंडारा जिल्हाचा पाॅझिटीव्हीटी दर 3.44% इतका असून तो पहिल्या स्थानी आहे.
गेल्या २ महिन्यापूर्वी जिल्ह्यात रोज १००० ते १२०० रुग्ण आढळून येत होते. मात्र जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्णांचा शोध घेऊन कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेत उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून मृत्युदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे.
गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी दर अवघा 3.83 %.वर आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटीचा दर हा राज्यातील दुस-या स्थानी आहे तर भंडारा जिल्हा 3.44% पहिल्या स्थानी आहे. राज्यातील सरासरी पॉझिटीव्हीटीचा दर हा तब्बल ११.०६ टक्के आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग आढळून येत आहे. अगदी सातार्यात तर २१.९३ टक्के इतका पॉझिटीव्हीटीचा दर आहे. या पार्श्वभूमिवर, जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग हा आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येत असून यासाठी जिल्हाभरात लसीकरण केंद्र सुरु केले आहेत.



