भुसावळात वीज कामगार व अभियंते संयुक्त कृती समितीतर्फे आजपासून
कामबंद आंदोलन ;
भुसावळ (प्रतिनिधी )–
भुसावळ विभागातील वीज कामगार व अभियंते संयुक्त कृती समितीतर्फे आज दिनांक २४-०५-२०२१ पासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले.
यामध्ये भुसावळ शहर उपविभागातील पी.सी.युनिट, सातारा ब्रिज कक्ष, शिवाजी नगर कक्ष, डि.एस.ग्राऊंड कक्ष, भुसावळ विभागीय कार्यालय, भुसावळ शहर उपविभागीय कार्यालय, भुसावळ ग्रामिण उपविभागीय कार्यालय, जामनेर उपविभागीय कार्यालय, जामनेर ग्रामीण 2 कक्ष, जामनेर ग्रामिण कक्ष-1, शिंदी कक्ष, फिल्टर युनिट चोरवड सहभागी झाले होते.



