भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल प्रशासन द्वारा भुसावळ -पुणे -भुसावळ विशेष गाडी मध्ये बदल करण्यात आला आहे तो बदल पुढीलप्रमाणे –
भुसावळ -पुणे च्या ऐवजी हि आता भुसावळ -दौंड विशेष चालवण्यात येईल . दिनांक २७.०५.२०२१ ते २९.०७.२०२१ पर्यंत हा बदल करण्यात आला आहे . हा बदल दिनांक २७.०५.२०२१ पासून राहिल
*ट्रेन नंबर 01135 विशेष भुसावळ – येथून दर गुरुवारी ०६.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दौंड येथे १५.१० वाजता पोहचेल.
*ट्रेन नंबर 01136 विशेष दौंड येथून दर गुरुवारी १२.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी भुसावळ येथे २०.४५ वाजता पोहचेल.
थांबा- जळगांव, चाळीसगांव, मनमाड, कोपरगांव, बेलापूर, अहमदनगर
या विशेष ट्रेनच्या तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.



