जळगाव –
अमेरिकेतील ऑकलँड विद्यापिठातून
मास्टर इन सॉफ्टवेर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नोलोजी ची पद्व्युत्तर पदवी संपादन करत तीने महाराष्ट्रासह समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
जळगावं जामोद जिल्हा बुलढाणा येथील परिहार कुटंबातील ज्योती वसंतसिंह परिहार ही कन्या आहे .
वसंतसिंह परिहार आणि सुधाताई परिहार यांना दोन अपत्य
ज्योती आणि विजेंद्र ज्योती विजेंद्र पेक्षा वयाने धाकटी.
लहान पणीच वडीलांच छत्र हरवलेल्या ज्योती आणि विजेंद्रचा सांभाळ आई सुधाताई परिहार यांनीच केला
ज्योती चे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जळगांव जामोद येथे झाले पुढे १२ वी च्या शिक्षणानंतर ज्योतीला
श्री.संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,शेगांव येथे प्रवेश मिळाला तिथून तिने ईलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीक्म्युनिकेशन मधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. दरम्यान स्वत:च्या बुद्धी कौशल्यावर तिची कॉलेज कॅम्पस मधून पुणे येथील नामांकित कंपनी मध्ये निवड झाली. प्राप्त संधीचे सोने करत तिने जॉब स्विकारला आणि या माध्यमातून तीला युएसए ला जाण्याची संधी मिळाली. सन २०१८ मध्ये दापोली येथील अमेरिका स्थित ओंकारराव आनंदे यांच्याशी ज्योतीचा विवाह ठरला आणि घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असतांना अचानक आईचे निधन झाले. आईनंतर वडीलांची आणि आईची दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत भाऊ विजेंद्रसिंह परिहार यांनी बहिण ज्योती आणि ओंकारराव आनंदे यांचा विवाह समारंभ मोठ्या थाटात पार पाडला.
वडील लहानपणीच गेलेले असतांना आता आई गेल्याचे दु:ख दोघा भावंडांवर आले होते परंतु अश्या परिस्थितीतही खचून न जाता न डगमगता
ज्योतीचे अथक परिश्रम चालूच होते यात पती ओंकार यांची साथ महत्वाची ठरली व स्वतःचे परिश्रम आणि जिद्दिच्या जोरावर तिला ऑकलँड सारख्या विद्यापिठातून पद्व्युत्तर पदवी मिळवणे शक्य झाले.
महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद सारख्या छोट्या गावातील मुलीने ऑकलँड विद्यापिठापर्यंतचे मिळवलेले यश महाराष्ट्रासाठी खरोखरच अभिमानास्पद बाब आहे..
ज्योतीच्या या उत्तुंग भरारी व यशाबद्दल तीचेवर श्री राजपूत करणी सेना खान्देश विभाग व राजपूत समाज खान्देशने तर्फे प्रविणसिंह पाटिल विलाससिंह पाटिल, एस, डी, पाटिल सर ,विट्ठलसिंह मोरे , पत्रकार हर्षल पाटिल यांचेसह समाजातील सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत असून अभिनंदन व कौतुक होत आहे .
अशा या महाराष्ट्र कन्येच्या कर्तृत्वाला सलाम..



