जळगाव –

जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने 618 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 11 रुग्णांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 670 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत 2406 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर 24 तासात 670 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 34 हजार 511 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 22 हजार 452 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
शनिवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 66
जळगाव ग्रामीण 26
भुसावळ 57
अमळनेर 39
चोपडा 85
पाचोरा 06
भडगाव 04
धरणगाव 35
यावल 34
एरंडोल 45
जामनेर 60
रावेर 32
पारोळा 00
चाळीसगाव 58
मुक्ताईनगर 32
बोदवड 35
अन्य जिल्हा 04


