रावेर :

गस्तीवरील पोलिसांवर ठासणीच्या बंदुकीतून गोळीबार करणार्या दोघा आरोपींच्या अटकेनंतर उर्वरीत तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पाल-रावेर रस्त्यावरील पाल येथील ढाब्याजवळ मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या पाच संशयीतांपैकी एकाने पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. संशयीत शिकारी असल्याची माहिती निष्पन झाल्यानंतर सुरूवातीला दोघांना तर नंतर तिघांना अटक करण्यात आली.
या आरोपींना झाली अटक
सुरूवातील गारबर्डी येथील रमेश जगन पावरा (वय 30) व सुनेश लालसिंग पावरा (वय 25) यांना अटक करण्यात आली तर गुरुवारी विजय मगरसिंग पवार, दिनेश जबरसिंग बारेला, दशरथ शिकार्या पावरा (सर्व रा.गरबर्डी) यांना पोलिसांनी अटक केली. अधिक तपास सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.


