भुसावळ (प्रतिनिधी )-
उत्तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या समन्वयक विद्यमान आमदार प्रणिती ताई सुशीलकुमार शिंदे ह्या आज दि.१५ मे रोजी
जळगांव दौऱ्यावर आले असता महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने ७ मे २०२०१ ला मागासवर्गीय समाजाच्या पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याचा जो निर्णय घेतला तो मागे घेणेसाठी जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु. जाती विभागाच्या वतीने चर्चा करून निवेदन देण्यात आले.
यावेळी जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, प्रदेश समनव्यक राहूल मोरे, अनु जाती विभागाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा मोरे, रावेरच्या महिला तालुका अध्यक्ष मनिषा पाचपांडे, भुसावळ शहर अध्यक्ष सुनिल जोहरे तसेच पदाधिकारी उपस्थित होते..



