जळगाव –
जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने 789 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 12 रुग्णांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 816 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत 2386 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर 24 तासात 816 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 33 हजार 212 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 20 हजार 971 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे

.गुरूवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 122
जळगाव ग्रामीण 23
भुसावळ 106
अमळनेर 16
चोपडा 37
पाचोरा 29
भडगाव 15
धरणगाव 07
यावल 41
एरंडोल 11
जामनेर 30
रावेर 50
पारोळा 27
चाळीसगाव 87
मुक्ताईनगर 161
बोदवड 23
अन्य जिल्हा 04


