भुसावळ (प्रतिनिधी )-

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भुसावळ ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्षपदी जितेंद्र शिवाजी कोळी राहणार कठोरा बु यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी आमदार संजय सावकारे व तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील उपस्थित होते .युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे ,खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, सभापती वंदनाताई उन्हाळे उपसभापती प्रीती ताई पाटील, जिल्हा चिटणीस राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, तालुका सरचिटणीस दिलीप कोळी सर्वांनी जितु कोळी यांचे अभिनंदन केले


