स्मार्ट विलेज साकेगाव ग्रामपंचायतीच्या थकबाकी वसुली सुवर्ण बक्षीस योजनेस प्रारंभ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-

आज पासून स्मार्ट विलेज साकेगाव ग्रामपंचायतीच्या थकबाकी वसुली सुवर्ण बक्षीस योजनेचे पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाघचौरे व तालुका पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ करण्यात आला
पहिल्याच दिवशी एक लाखाची वसुली ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद*
ग्रामस्थांनी सुवर्ण बक्षीस योजनेचा उत्तम प्रतिसाद देऊन ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केलेले आहे सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते दहा हजाराच्या वर घरपट्टी भरणाऱ्या तथा सर्व प्रथम 10 नागरिकांनी घरपट्टी भरले अशा 20 नागरिकांना मोफत पाण्याचे जार डस्टबिन व वर्षभर मोफत आरो पाणी मिळावे यासाठी डिजिटल स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले
प्रसंगी प्रभारी सरपंच आनंद ठाकरे ,सरपंच पती विष्णू सोनवणे, ग्राम विकास अधिकारी अशोक खैरनार ,ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल सपकाळे, हिम्मत सोनवणे, गजानन कोळी ,गजानन पवार ,सागर सोनवाल, कुंदन कोळी, सचिन राजपूत ,संतोष पाटील ,साबिर पटेल वासेफ पटेल, मुस्लिम समाज बांधवांचे मौलवी सह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *