वरणगाव –
तालुक्यातील वरणगाव येथे कोविड केअर सेंटर उभारणे संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून परवानगी प्राप्त झाल्याने शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांचे निवासस्थानी शिवसेना व चंद्रकांत हरी बढे सर विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . प्रसंगी आज क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांची जयंती असल्याने पत्रकार परिषदेच्या आधी क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व गावातील पत्रकार मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आले .
यावेळी पत्रकार परिषदेत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एडव्होकेट मनोहर खैरनार यांनी प्रास्ताविकात आपले मनोगत व्यक्त केले व सांगितले की वरणगाव शहरात सर्व पत्रकारांच्या मागणीनुसार मी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर यांच्याकडे मागणी लावून धरली व आज ५० बेडचे कोवीड केअर सेंटर वरणगाव शहरात मंजुर झाले आहे त्यासाठी त्यांनी सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
तसेच विश्वस्त मंडळाचे चंद्रकांत हरी बढे सर यांनी सदर कोविड केअर सेंटर साठी जागा उपलब्ध करून देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले . वरणगावसह पंचक्रोशीतील जनतेची सेवा व्हावी यासाठी ते वर्षभरापासून कार्यरत होते शेवटी शिवसेना व शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन व त्यांचे सहकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज कोविड केअर साठी मान्यता प्राप्त झाल्याने आनंद व्यक्त केला कोविड केअर सेंटर साठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी वरणगाव येथील मुस्लिम समाजाचे नेते सय्यद हॅप्पी भाई यांनी महाराणा प्रताप जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या वरणगाव शहरात कोविंड केअर सेंटर सुरू होणार असल्याने आनंद व्यक्त केला तसेच संतोष माळी अध्यक्ष क्रांतीज्योती महात्मा फुले एनजीओ यांनी देखील वरणगाव शहरातील जनतेला केअर सेंटरचा लाभ मिळण्यासाठी शहरातील सर्व लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले .
शिवसेनेचे उपजिल्हा संघटक विलास मुळे यांनी महाराणा प्रताप जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन वरणगाव शहरात उभ्या राहणाऱ्या सीसीसी संदर्भात जनतेस सहकार्य करण्याचे आवाहन केले .
शिवसेना अल्पसंख्यांकाच्या उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी यांनी वरणगाव येथील सीसी विषयी समाधान व्यक्त केले व संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले यावेळी शिवसेना उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने व मुक्ताईनगर चे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या अनमोल सहकार्याने व मार्गदर्शनाखाली सदर केअर सेंटर तयार होणार असून आम्ही केलेल्या विनंती प्रमाणे जिल्हाधिकारी , जिल्हा शल्य चिकित्सक यांचे आभार व्यक्त केले, तसेच सदर कामासाठी प्रांत अधिकारी भुसावळ ,तहसीलदार , मुख्याधिकारी नगरपरिषद वरणगाव ,आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय वरणगाव ,यांनी सहकार्य केले त्याबद्दल व चंद्रकांत हरी बढे सर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य एडव्होकेट मनोहर खैरनार , मुस्लिम समाजाचे नेते सय्यद , हँप्पी भाई यांनी केलेल्या व करीत असलेल्या आणि करत राहणार असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन , सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मनोहर खैरनार, उपजिल्हा संघटक शिवसेना विलास मुळे, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद हँपीभाई, अल्पसंख्यांकाच्या उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी, उपतालुका प्रमुख सुभाष पाटील , पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे , क्रांती ज्योती महात्मा फुले, एनजीओचे अध्यक्ष संतोष माळी, अल्पसंख्यांक तालुका संघटक अबरार खान, राजपूत करणी सेनेचे दीपक पाटील , अरबाज पैलवान , कदिर खाटीक , राहुल बावणे , सागर वंजारी , नितीन पाटील , कृष्णा पुजारी आदीं उपस्थित होते .



