भुसावळ (प्रतिनिधी )-

रेल्वेने पुणे आणि गोरखपूर/दानापूर/दरभंगा/ भागलपूर दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या / अतिजलद विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
१. पुणे – गोरखपूर – पुणे विशेष (१० फे-या)
01329 विशेष दि. ११.५.२०२१, १३.५.२०२१, १५.५.२०२१, १८.५.२०२१ व २०.५.२०२१ (५ फे-या) रोजी २१.३० वाजता पुणे येथून सुटेल आणि गोरखपूर येथे तिसर्या दिवशी ०९.०० वाजता पोहोचेल.
01330 विशेष दि. १३.५.२०२१, १५.५.२०२१, १७.५.२०२१, २०.५.२०२१ व २२.५.२०२१ (५ फे-या) रोजी गोरखपूर येथून १९.०० वाजता सुटेल व पुण्याला तिसर्या दिवशी ०५.२५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती.
संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.
२. पुणे – दानापूर – पुणे विशेष अतिजलद (६ फे-या)
01331 विशेष पुणे १०.५.२२११, १४.५.२०२१ व १७.५.२०२१ (३ फे-या) रोजी १०.०० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसर्या दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल.
01332 विशेष दिनांक ११.५.२०२१, १५.५.२०२१ व १८.५.२०२१ (३ फे-या) रोजी दानापूर येथून २३.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसर्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा.
संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.
३. पुणे – दरभंगा – पुणे विशेष (४ फे-या)
01333 विशेष गुरुवार दि. १३.५.२०२१ व २०.५.२०२१ (२ फे-या) रोजी पुणे येथून सकाळी १०.०० वाजता सुटेल आणि दरभंगा येथे दुसर्या दिवशी २३.०० वाजता पोहोचेल.
01334 विशेष शनिवार दि. १५.५.२०२१ व २२.५.२०२१ (२ फे-या) रोजी दरभंगा येथून १६.४५ वाजता सुटेल आणि पुण्याला तिसर्या दिवशी ०६.२५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर.
.
संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.
४. पुणे – भागलपूर – पुणे विशेष (२ फे-या)
01335 विशेष पुणे येथून दि. १६.५.२०२१ रोजी (१ ट्रिप) सकाळी १०.०० वाजता सुटेल आणि भागलपूर येथे तिसर्या दिवशी ०१.४५ वाजता पोहोचेल.
01336 विशेष भागलपूर येथून दि. १८.५.२०२१ रोजी (१ फेरी) १५.०० वाजता सुटेल व पुण्याला तिसर्या दिवशी ०६.२५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., सासाराम, गया, किउल, जमालपूर
संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण : पूर्णतः आरक्षित विशेष ट्रेन /अतिजलद विशेष गाडी 01329 , 01331 चे विशेष शुल्कासह बुकिंग दि. ९.५.२०२१ रोजी तर 01333 चे विशेष शुल्कासह बुकिंग दि. १०.०५.२०२१ ला व 01335 चे विशेष शुल्कासह बुकिंग दि. ११.५.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षणावरील केंद्रे आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


