भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये लशीचा जास्त पुरवठा करावा अशी मागणी आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे
यांना शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी केली असून याबाबत प्रत रवाना केली आहे .

भुसावळ शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता भुसावळ तालुक्याला कोवक्सिन आणि कोविशील्ड लस अत्यंत अल्प प्रमाणात उपलब्ध होत आहे ही लस जास्त प्रमाणात तालुक्यातील नागरिकांना मिळावी .
नागरिकांची शारीरिक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व कोरोना वर मात करण्यासाठी लस प्रभावशाली असल्यामुळे आता नागरिक मोठ्या संख्येने लस केंद्रावर गर्दी करत आहेत त्यामुळे लसीचा तुटवडा भासत आहे भुसावळ शहरात नागरिकांची गैरसोय होत आहे याकरीता जास्तीची लस द्यावी जेणेकरून लवकरात लवकर नागरिकांना लस मिळाल्यास त्यांचे प्राण वाचतील व जीवित हानी होणार नाही असेही या निवेदनात म्हटले आहे याबाबत ना पालक मंत्री व
जिल्हाधिकारी यांना प्रत रवाना केली आहे .


