18 वर्षावरील लसीकरणात भुसावळ सोबत दुजाभाव का ? – शिशिर जावळे यांचा जिल्हाधिकारी यांना सवाल ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
नुकतेच महाराष्ट्र राज्य शासनाने18ते 44 वय वर्षापर्यंतच्या सर्वांना एक मेपासून जशी प्राप्त होतील तसे मोफत लसीकरण करण्याचे ठरविले. आणि म्हणून लागलीच दिनांक 28 मे 2021 पासून महाराष्ट्रातील अठरा वर्षाच्या वरील लाखो लोकांनी कोवीन ॲप वर नाव नोंदणी केली आहे. दिनांक 1 मे 2021 रोजी जळगाव जिल्ह्याला 18 वर्षावरील लोकांच्या लसीकरणासाठी प्राप्त झालेल्या लसी प्रथम जळगाव शहर व तालुक्यात व दोन दिवसात नंतर जिल्ह्यालातील विविध तालुक्यातील विविध ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर थोड्या थोड्या प्रमाणात लस वाटप करणार असल्याचे जळगावजिल्हा शल्य चिकित्स क डॉक्टर चव्हाण यांनी नुकतीच प्रसारमाध्यमांना याबद्दल माहिती दिली. आजपावेतो गेल्या 2 दिवसापासून जळगाव शहर व काही विशिष्ट तालुक्यातील काही विशिष्ट केंद्रात 18ते 44 वर्षाच्या ना लस देण्यात आली. तसेच 4 मे पर्यंत 18 ते 44 वर्षापर्यंत लोकांचीसदर लसीकर णा साठी बुकींग झाली. असून त्यांना लस देण्यात येणार आहे. जळगांव जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रात थोडया थोडया प्रमाणात हि लस देण्याचे प्रशासनाने सांगितलं.असे असताना देखील फक्त आणि फक्त सध्या तरी जळगांव व काही तालुक्यातील विशिष्ट लसीकरण केंद्रात च 18ते 44 वयोगटातील सर्वाना लसीकरण सुरू आहे.त्यातील काही लसीकरण केंद्राना पुन्हा पुन्हा 18वर्षावरील लोकांसाठीची लस उपलब्ध करून दिली जात आहे. मग जळगाव जिल्ह्याच्या विविध तालुक्याच्या वाट्याला येणारे हक्काचे लसीकरणात भुसावळ तालुक्यातील 18ते 44 वयोगटातील सर्वाना लसीकरण आवश्यक लस आजपवेतो जळगांव जिल्हा प्रशासनाने डोस का पुरविले नाहीत.भुसावळ तालुक्याला का डावलल.. हा दुजाभाव भुसावळ शहर व तालुक्यासाठी का ? जळगाव शहराला इतके झुकते माप कशासाठी ? असा सवाल शिशिर जावळे यांनी जळगांव जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत व जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांना एका पत्राद्वारे केला आहे.व त्वरित भुसावळ शहर व तालुक्याला 18ते 44 वयोगटातील सर्वासाठी आवश्यक लस त्वरित उपलब्ध करून मिळावी अशी मागणी जळगाव जिल्हाधिकारी व जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कडे केली असल्याच सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकानव्ये कळविलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *