भुसावळ (प्रतिनिधि )–

भुसावळचे नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी खाजगी शाळा चालकांकडून चालणार्या मनमानी कारभाराची तक्रार करण्यात आली असून मनमानी करणार्यांना चाप लावण्याची मागणी करण्यात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे. गेल्या एक वर्षापासून 1कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यातरी नागरीकांच्या हाताला काम-धंदा नसल्याने मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच काही खाजगी शिक्षण संस्था आपला मनमानी कारभार करीत आहे. पाल्यांकडून पंचवीस ते चाळीस हजार वार्षिक फी घेतली जात आहे त्यामुळे पालकांना मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटत आहे. काही पालक पोटाला चिमटा देवून मुलांना शिकवण्यासाठी खाजगी शिक्षण संस्थेचे चेअरमन किंवा अध्यक्ष यांना हात जोडून गया-गया करीत असून अशा शिक्षण संस्थांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. लवकरत लवकर याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी केली आहे.


