वरणगावात केली जातेय अप्रशिक्षीतांकडून रॅपीडेंटिजनची चाचणी ; कोरोनाच्या नावाखाली पालिकेसह पोलिसांचा हलगर्जीपणा ;

वरणगाव –

शहरासह परिसरात कोरोना संक्रमणाचा धोका अधिक वाढल्याने नगर परीषद व पोलिस प्रशासनाच्या वतीने रॅपीडेंटिजन टेस्ट सुरु केली आहे. मात्र त्यासाठी उपलब्ध टेक्नीशियन कडे चाचणी करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्रच नसल्याने सदर विभाग आपल्या विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या जीवासह नागरींकाच्या जीवाशी खेळ करतांनाचे चित्र दृष्टीस पडत आहे .
जिल्हया सह सर्वत्र कोरोना संसर्गाने अक्षरश: थैमान घातले असुन वरणगाव परिसरसुध्दा त्याला अपवाद नाही . त्याअनुशंगाने परीस्थीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपरीषद व पोलिसांच्या संयुक्त दक्षतेनुसार शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोंकाची रॅपीडेंटिजन कोरोना चाचणी केली जात आहे . यातून रीकामे फिरणाऱ्यांचे हि प्रमाण कमी होत आहे. आणि शहरांत बाधीत झालेले रुग्ण सुध्दा मिळण्यास मदत होत असली तरी शासन नियमाचे उल्लंघन होतांना दीसुन येत आहे. शहरांतील व परीसरांतील कोरोना सदृष्य परीस्थीती नियंत्रणात आणण्याकरीता जिल्हा स्थरावरून त्याच दृष्टीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी.सौरभ जोशी, पोलिस प्रशासनाचे डिवायएसपी. नितीन गणापूरे, आरोग्य विभागाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.क्षितीजा हेंडवे यांनी संयुक्त विचाराधीन शासकिय नियम पाळून निर्णय घेणे अपेक्षीत आहे. त्या दृष्टीने संचारबंदिअसतांना विविध कारणे सांगून बाहेर फिरणाऱ्यांच्या नागरीकांच्या रॅपीडेंटिजन टेस्ट करावी त्यामूळे बाहेर फिरणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल आणि खरे संसर्ग झालेले बाधीत सुध्दा मिळतील असे नियोजन करण्यात आले. नगर परिषदेने कर्मचाऱ्यांसह रॅपीडेंटिजन किट पुरवणे, पोलिस कर्मचाऱ्यांनि रिकामे फिरणाऱ्यांना पकडून आणणे आणि आरोग्य विभागाने प्रशिक्षण घेतलेल्या टेक्नीशियन द्वारे त्यांची टेस्ट करावी टेक्नीशीयनने प्रक्रिया करून सदर व्यक्ती निगेटिव्ह आहे किवां पॉझेटिव्ह असा रीपोर्ट तयार करणे असे नियोजन बद्ध कार्य सुरू झाले असता आरोग्य विभागाच्या वरणगाव ग्रामिण रुग्णालयात सदरील टेस्ट करीता प्रशिक्षण घेतलेला किंवा त्या क्षेत्रातील टेक्नीशीयन उपलब्ध नसल्याचे डॉ हेंडवे यांनी सदर विभांगाच्या अधिकाऱ्यांना सांगीतले असतांना देखील नगर पालिकेचे व पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वैद्यकिय अधिकाऱ्याच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करीत रुग्णालयातील रोजंदारीवर काम करणाऱ्याना आठ रुपये देस्ट प्रमाणे आमिष दाखऊन टेस्ट करण्याचे सांगीतले मात्र या तीघांकडे या टेस्ट संबंधी कोणते हि प्रशिक्षण घेतल्याचा पुरावा नसतांना गेली तीन दिवसांपासुन हे व्यक्ती टेस्ट करीत आहेत. या परीस्थीतीत सुदैवाने टेस्टीगंमध्ये पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आला नाहि.परंतु दुदैवाने बाधीत रुग्ण जर आढळला असता तर सोबतीला सर्व बाधीत होण्याची शक्यता निर्माण झाली असती तर या व्यवस्थेला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थिता होत आहे

कोट . नगरपरीषद, पोलिस प्रशासन आणि आमच्या विभाअंतर्गत फिरस्ती पथक तयार करून नागरीकांच्या रॅपीडेंटिजन कोरोना चाचणीचे नियोजन केले होते. मात्र आमच्याकडे टेस्ट करणारी टेक्नीशीयन व्यक्ती उपलब्ध नसल्याने चाचण्या करता येणार नाहि असे दोन्ही विभंगाना कळवले होते. त्यामूळे शहरात होत असलेल्या कोरोना टेस्टमध्ये आमच्या आरोग्य विभागाचा संबध नाहि. अशी प्रतिक्रिया
डॉ .क्षितीजा हेंडवे
वैद्यकिय अधिकारी ग्रामिण रुग्णालय वरणगांव यांनी दिली .

शहरातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्याकरीता आम्ही हा प्रयत्न केला होता. त्याकरीता मी नगर परीषदेच्या माध्यमातून रॅपीडेंटीजन किटचा पुरवठा देखील केला आहे. मात्र आमच्या विभागाकडे टेस्टींग टेक्नीशीय प्रशिक्षीत आहे किंवा नाही अशी माहिती नाही त्यामूळे सदर परीस्थीतीबाबत योग्य तो निर्णय लवकच घेऊ . असे
सौरभ जोशी
प्रभारी मुख्याधीकारी
नगर परिषद वरणगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *