भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरांमध्ये आमचे सर्व पोलीस अधिकारी यांच्यासोबत कोरोनाच्या नियमावलीचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी आज आम्ही शहरांमध्ये राऊंड घेतला आहे. भुसावळच्या भाजीपाला मार्केटमध्ये मोठी गर्दी होत आहे त्यामुळे अंटिजन टेस्ट करण्याची मोहीम आज पासून सुरु करीत आहोत इथे असणाऱ्या भाजीविक्रेत्यांची आम्ही चर्चा केली असता बऱ्यापैकी मास्कचे पालन केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे बऱ्याचदा असं निदर्शनास येत आहे की पोलीस आल्यानंतरच नागरिक मास्क घालत आहेत या वृत्तीत बदल होणे गरजेचे आहे.भुसावळ शहरातील नागरिकांवर पोलीस व नगरपालिका कारवाई करीत आहे म्हणून पालन करण्यापेक्षा स्वयंस्फूर्तीने कोरोना नियमावलीचे पालन करावे असे मत जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केले.



