मुंबई-हटिया द्वि-साप्ताहिक व पुणे- दानापूर अतिरिक्त विशेष गाड्या ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
1.मुंबई-हटिया द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष
01127 विशेष द्वि-साप्ताहिक दि. १३.४.२०२१ ते ३०.४.२०२१ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवार आणि शुक्रवारी २३.०५ वाजता सुटेल आणि हटिया येथे तिसर्‍या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.
01128 द्वि-साप्ताहिक विशेष दि. १५.४.२०२१ ते २.५.२०२१ पर्यंत प्रत्येक गुरुवार आणि रविवारी हटिया येथून ०८.४० सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी १३.३० वाजता  पोहोचेल.
थांबे : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ जंक्शन, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला.
संरचना : २ तृतीय वातानुकूलित,   ५ शयनयान, १४ द्वितीय आसन श्रेणी. 
2. पुणे- दानापूर विशेष 
01439 अतिजलद विशेष दि. १३.४.२०२१, २०.४.२०२१ व  २७.४.२०२१ रोजी पुणे येथून ०६.१०  वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसर्‍या दिवशी ११.४०  वाजता  पोहोचेल. 
01440 विशेष दि. १४.४.२०२१, २१.४.२०२१ व  २८.४.२०२१ रोजी  ​​वाजता दानापूर येथून १३.४० वाजता सुटेल आणि पुण्याला दुसर्‍या दिवशी २३.१० वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी आणि पं.  दीन दयाल उपाध्याय जं. 
संरचना : २ तृतीय वातानुकूलित,  ९ शयनयान, ९ द्वितीय आसन श्रेणी. 

आरक्षण : पूर्णतः राखीव असलेल्या 01127, 01439 या  आरक्षित विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. १२.४.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि  www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. 

 —

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *