वरणगांव येथे बस थांबवणे बाबत मागणी ;राष्ट्रवादी कॉंग्रेसने आगार प्रमुखांना दिले निवेदन ;


वरणगाव – (प्रतिनिधी )-
महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्याने बसेस वरणगांव मध्ये न येता सरळ महामार्गाने जात आहेत. परिणामी प्रवासी त्रस्त झाले आहेत व परिसरातील खेड्यातील लोकांचेही ये जा करणे त्रासदायक ठरू लागले आहे. त्यामुळे पूर्वी ज्या बसेस वरणगांव मार्गे जात होत्या त्या सर्व याच मार्गे जाऊन महार्गावरील सर्व बसेस वरणगांव येथे थांबल्या पाहिजेत अन्यथा सर्व सामान्य लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार राहाल असे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका भुसावळच्यावतीने लेखी निवेदन सादर करून आगारप्रमुख प्रमोद चौधरीना भेटून वरणगांव बस स्टॅन्डवर बसेस थाबण्या सदर्भात राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष दिपक मराठे याच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले .
तसेच जिल्हा बस नियंत्रक ( D .P.O ) दिलीप बंजारा जळगांव याच्याशी पण दुरध्वनी वर संपर्क साधून कैफीयात माडली व वरणगांव बस स्टॅन्डवर बसेस न थांबल्यास तीव्र स्वरूपाचे आदोलन छेडण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे . यावेळी अधिका-यांनी सदरचे बस लगेच देण्यात येतील व बसेस वरणगांव बस स्टॅंन्डवर थाबतील असे आश्वासन दिले
यावेळी भुसावळ तालुकाध्यक्ष दिपक मराठे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार, वरणगांव शहरउपाध्यक्ष कैलास माळी, युवक तालुका कार्याध्यक्ष विनायक शिरनामे, अहसान अहमद, इफ्तेखार मिर्झा, ओबीसी सेल वरणगांव शहराध्यक्ष हिमालय भंगाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *