रावेर शहरात निर्जतुंकीकरणा साठी फवारणी करावी – राष्ट्रवादीकाँग्रेस तर्फे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी ;

    रावेर, –

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात निर्जतुंकीकरणा साठी फवारणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनान्वये करण्यात आली आहे. 

    कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पालीकेने शहरात निर्जतुंकीकरणा साठी फवारणी करावी तसेच लहान मोठ्या वाहनांची तसेच पदचारी यांची सतत वर्दळ असलेल्या शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यानच्या रोडची  दुरावस्था झालेली असुन ठीक ठीकाणी खड्डे पडलेले आहेत या रोडची त्वरीत दुरुस्ती करावी अशा मागण्या मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दिलेल्या निवेदनान्वये करण्यात आलेल्या आहेत.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष शे.मेहमूद, तालुका कार्याध्यक्ष विलास ताठे, तालुका सरचिटणीस ईश्वर निळे हे उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *