भुसावळ (प्रतिनिधी) –
भुसावळ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे संपन्न झालेला सत्कार हा माझा तेविसावा सन्मान आहे. भुसावळ माझं सासर असून इथला सत्कार मला माहेरचा वाटतो. आपल्या माहेरात आपल्या जिव्हाळ्याच्या लोकांमध्ये झालेला सत्कार शब्दात सामावणे अशक्य आहे असे भावोद्गार लता बोरीकर यांनी भुसावळ येथे काढले.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना तालुका च्या वतीने झालेल्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हा प्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या सहकार्याने उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या सत्कारात त्या बोलत होत्या.
मुंबईत रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे प्राण वाचवले होते या धाडसी कार्याचे कौतुक म्हणून लता बोरीकर यांचा झाशीची राणी प्रतिमा भेट देऊन रावेर लोकसभा जिल्हा संघटक विलास मुळे व उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक उत्तम सुरवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शहरप्रमुख नीलेश महाजन यांनी या सत्काराच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले.सत्काराला उत्तर देताना बोरिकर म्हणाल्या की आज सत्कार स्वीकारताना माझ्या एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत. कारण मी माझा स्वतःचा लहान मुलगा आणि पती यांचा जीव धोक्यात घालून आणि जीवावर उदार होऊन त्या प्रवाश्याचा जीव वाचविला होता. मात्र मी अजूनही कायम नोकरीच्या शोधात आहे. अजूनही मी कार्यरत असलेल्या विभाग, गृह विभाग आणि राज्य शासनाने सत्कारापलीकडे कोणतीही दखल घेतली नाही. शौर्य गाजवणाऱ्या व्यक्तींना पोलीस भरतीत प्राधान्य क्रमाने नियुक्ती द्यावी अशी माझी मागणी आहे. जेणेकरून असा पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्तींना बळ मिळेल. तसेच शिवसेना परिवाराने माझ्या पाठीशी उभे राहून जर शासन स्तरावर माझ्या मागणी मांडतील तर मला व माझ्यासारख्या इतरांना निश्चितपणे न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षाला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दुजोरा देत प्रा उत्तम सुरवाडे यांनी पाठपुरावा करण्यासंबंधी आश्वासित केले. या सहृद्य आणि छोटेखानी सोहळ्यात उपजिल्हा संघटक विलास मुळे, माजी नगरसेवक दिपक धांडे यांनी मनोगत व्यक्त केले. उपजिल्हाप्रमुख ऍडव्होकेट श्याम श्रीगोंदेकर यांनी मनोगतात लता बोरकर यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना शौर्य पुरस्कार मिळविण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रसंगी त्यांचे पती नीरज बोरकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करीत तू अशीच प्रगती करीत राहा मी तुझ्या पाठीशी आहे अशी भावना व्यक्त केली. यावेळी उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख एडव्होकेट श्याम श्रीगोंदेकर, उपजिल्हाप्रमुख प्रा उत्तम सुरवाडे, शहर प्रमुख नीलेश महाजन, शहर प्रमुख बबलू ब-हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, तालुका संघटक प्रा धीरज पाटील, माजी शहरप्रमुख नामदेव ब-हाटे, ज्येष्ठ शिवसैनिक शरद जोहरे, प्रसिद्धी प्रमुख गोकुळ बाविस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन उपजिल्हा प्रमुख प्रा उत्तम सुरवाडे यांनी केले.


