भुसावळ(प्रतिनिधी )-

येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये भाग 5 गुरन 790/2020 भा द वि कलम-307,143, 144,147,148,149 सह कलम मु पो ऍक्ट कलम-37(1)(3)चे उल्लंघन 135 प्रमाणे दिनांक 16.08.2020 रोजी 7 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील फिर्यादी शेख नाजीस शेख नासिर रा.मणियार कॉलनी भुसावळ यास यातील आरोपी यांनी दिनांक 16.08.2020 रोजी 10.30 वाजता पाईप लाईन मध्ये विटा टाकण्याच्या करण्यावरून यातील फिर्यादस चाकूने व लोखंडी रॉड ने तसेच लाकडी काठयाने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील गुन्हा घडल्या पासून फरार आरोपी शेख अबरार शेख समोसोद्दीन वय-25,रा.मणियार कॉलनी जवळ भुसावळ याची सहा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक ,भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन याना मिळालेल्या गुप्त बातमी वरून आरोपी यास दिनांक.12.02.2020 रोजी दुपारी 12.30 वाजता भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी भागातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे .
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे तसेच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी ,व उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व सहा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक ,याच्या मार्गदर्शनाखाली स पो निरीक्षक अनिल मोरे व पो हे कॉ सुनील जोशी, पो ना रमण सुरळकर, उमाकांत पाटील,किशोर महाजन, पो का विकास सातदिवे, ईस्वर भालेराव, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, कृष्णा देशमुख पो हे का चालक अयाझ सय्यद अशानी केली आहे.
.


