मुक्ताईनगर (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अत्याधुनिक अशा १०० रुग्णवाहिकांचे मुंबई येथे लोकार्पण करण्यात आले त्यापैकी एक रुग्णवाहिका मुक्ताईनगर शिवसेनेला मिळाली होती. त्या रुग्णवाहिकेचे मुक्ताईनगरात आगमन झाल्यानंतर आज दि.१२ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रवर्तन चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या रणरागिनींनी रुग्णवाहीकीचे औक्षण व पूजन केले तसेच यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली.ही रुग्णवाहिका अतिप्रसंगात आलेल्या व्यक्तीची जीवन तारणारी माऊली म्हणून नावारूपास येईल अशी घोषणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
यावेळी तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, उपतालुका प्रफुल्ल पाटील ,जीवराम कोळी, अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान , शकुर जमदार, रामभाऊ पुनासे , गोपाळ सोनवणे, शहर प्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, शहर संघटक वसंत भलभले , नगरसेवक संतोष मराठे, नगरसेविका सविता भलभले, जाफर अली, जहिर खान , सलीम खान ,वर्षा घुले, सुनंदा घुले, लक्ष्मी भोई, अनिता सुरवाडे, अलका कांडेलकर, भारती जयकर, सुनीता जयकर, सुलभा जाधव, सुपडाबाई काकडे, लता घुले ,उषा पाटील, नर्मदा गोसावी , बबिता इंगळे, रेखा जयकर, यशोदा माळी, शारदा भोई, उज्वला सोनवणे , सुनीता तळेले, कल्पना पालवे , लता ठाकरे , उज्वला सोनवणे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, तालुका प्रमुख पंकज राणे , माजी तालुका प्रमुख सचिन पाटील, किरण कोळी, शुभम शर्मा, चंद्रकांत मराठे , दिलीप पाटील , सुभाष पाटील , ललित बाविस्कर , सचिन हिवराळे, दिपक पवार , स्वीय सहायक प्रवीण चौधरी , प्रशांत पाटील यांच्यासह शिवसेना, युवा सेना व महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच शिवसैनिक बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती .



