युवासेना उपतालुका प्रमुख यांच्या निवेदनाची दखल ; महावितरणने त्वरीत केली पोल दुरुस्ती


भुसावळ (प्रतिनिधी )-
युवासेना उपतालुका
प्रमुख पवन बाक्से यांचे निवेदनाची महावितरणने त्वरीत दखल घेवून वाकलेले स्ट्रीट लाईटचे पोल त्वरीत दुरुस्त काम पूर्ण केले .

गेल्या काही दिवसांपासुन शिवपूर कन्हाळा रोड वरती आर.एम.एस काॅलोनी जवळील गोयन्का ट्रेडर्सच्या समोर मेन रोडवरती एक स्र्टिट लाइट पोल रोडच्या दिशेने वाकल्याने त्या पोलमुळे कोणाला जीवीत हानी होऊ नये म्हणून युवासेना उपतालुका
प्रमुख पवन गणेश बाक्से यांनी ताबडतोब महावितरनचे सिव्हिल महाजन यांना मोबाईल फोनवर
संपर्क साधला त्यानुसार महाजन यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली तेथे असलेले तडवी यांना संपर्क साधुन त्यांना पोल कश्या पध्दतीने वाकलेला आहे याचे चित्र दाखवले आणि निवेदन दिले. त्यानुसार
साहेबांनी त्यावर ताबडतोब निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी त्यांचे कामगार पाठवून ते काम पूर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *