जोगलखेड्यात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील जोगलखेडे येथे नुकताच राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते नवमतदारांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. यावेळी बी.एल.ओ. जितेंद्र झांबरे यांनी मतदानाचे महत्त्व सांगितले. आमदार सावकारे यांनी जगातील एका मोठ्या लोकशाही राष्ट्रांत आपण राहतो याचा अभिमान असल्याचे सांगून लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
सूत्रसंचालन शिक्षक गणेश फेगडे यांनी केले. यावेळी माजी सरपंच पंकज पाटील, साकेगावचे माजी सरपंच अनिल पाटील, संजय पाटील, ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक प्रतिभा तायडे, सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *