वंचित बहुजन आघाडी तर्फे शेतकऱ्याच्या आंदोलनास समर्थन ; वंचित तर्फे ‘ किसान बाग आंदोलन ‘ ;


भुसावळ ( प्रतिनिधी) –
दिल्लीत गेल्या दोन महिन्या दिवसा पासून तीन काळे कायदे रद्द करण्यासाठी होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज वंचित तर्फे ‘ किसान बाग ‘ आंदोलन करण्यात आले होते.
सदर आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केले.
आज देशाचा पोशिंदा संकटात सापडला आहे.त्याला बरबाद करणारे तीन काळे कायदे जबरदस्तीने त्याचेवर लादले जात आहेत.शेतकऱ्याच्या शेत मालाला हमी भाव मिळत नाही म्हणून देशाच्या राजधानी दिल्ली भोवती लाखो शेतकरी आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. हाडे गोठवणाऱ्या थंडीत ही चिवटपणे ,अनेक संकटाचा सामना करत सरकार ला विनवणी करत आहे मात्र केंद्र सरकारच्या अहंकार आणि व्यापारी धार्जिणा धोरणा मुळे शेतकऱ्याच्या न्याय मागणीस धुडकावले जात आहे.आज देशाचा पोशिंदा जगला तर आम जनतेस अन्न मिळेल तेच धान्य मुठभर व्यापारी घराण्याच्या गोदामात गेले तर जनता अन्न अन्न करून तरफडून मरून जाईल अशी अवस्था होवू नये ,शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे रद्द करण्यात आले पाहिजे या साठी शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत झालेल्या शाहीन बाग आंदोलनाच्या धर्तीवर किसान बाग आंदोलन करण्यात आले.
विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,हाजी मुश्ताक सैय्यद हाजी कमरुद्दीन रावेर-यावल विधानसभा उमेदवार वंचित बहुजन आघाडी, दिनेश इखारे जिल्हा महासचिव, रफिक बेग जिल्हा उपाध्यक्ष , मोहम्मद शफी शेख जिल्हा उपाध्यक्ष, शेख सलीम जिल्हा संघटक सचिव,हाजी कमरुद्दीन, हाजी सैय्यद अली, हाजी सलीम, हाजी तसलिम, हाजी निसार, बाळा पवार, गणेश इंगळे, वंदनाताई सोनवणे, संगिताताई भामरे ,बंटी सोनवणे,रुपेश कुऱ्हाळे, सचिन सोनवणे, प्रमिलाताई बोदडे, मीनाक्षी वाघोदे, लता सुरडकर,बाळु शिरतुरे रावेर तालुकाध्यक्ष, मनोज कापडे यावल तालुकाध्यक्ष, नितिन रणित जिल्हा उपाध्यक्ष, नागसेन सुरडकर जिल्हा सचिव, राजेंद्र बारी जिल्हा संघटक ,अरूण नरवाडे जिल्हा कोषाध्यक्ष, युसुफ सैय्यद, आसिम सैय्यद, कासिफ सैय्यद, अजहर सैय्यद, इमरान सैय्यद, मंजुर सैय्यद, नजमुद्दीन सैय्यद, खलील खान, रफिक खान, याकुब खान, फिरोज खान, सलमान सैय्यद,मउजेर शेख, फारूख शेख, खालीद शेख, तय्यब सैय्यद,हैदर सैय्यद आदी आन्दोलना उपस्थिती आंदोलनाला होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *