भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार भरत शिरसाठ यांना पोलिस खात्यात आजपर्यंत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना पोलिस महासंचालक यांच्या सन्मानचिन्हाने मंगळवार, 26 जानेवारी रोजी औरंगाबाद लोहमार्गचे पोलिस अधीक्षक यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले. भुसावळ लोहमार्गचे निरीक्षक सुरेश सरडे यांनी त्यांचा पोलिस ठाण्यात सत्कार केला. शिरसाठ यांचा पोलिस महासंचालकांच्या चिन्हाने सन्मान झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



