भुसावळ (प्रतिनिधी )- येथील मॉर्डन रोड वरील पोस्ट ऑफिस समोरील सेलिब्रेशन कापड दुकानाला मंगळवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने सुमारे सात ते आठ लाखाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे .आग वेळीच आटोकयात आल्याने मोठा अनर्थ टळला .
येथील माजी नगराध्यक्षअख़्तर पिंजारी यांचे लहान बंधू यांचे मॉर्डन रोड वर सेलिब्रेशन नावाचे रेडीमेड कापड दुकान आहे . मंगळवार दिनांक 26 जानेवारी रोजी दुकान बंद होते , परंतू दुकानाला अचानक रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली व या आगीत दुकानातील संपूर्ण कपडे जळून बेचीराख झाले यात अंदाजे सात ते आठ लाखाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज दुकान मालकांसह पोलिसांनी वर्तवीला आहे.
दरम्यान घटनास्थळी अग्निशामक दलाला पाचारण केले असता या कर्मचाऱ्यांनी त्वरित आग विझवून आग नियंत्रणात आणल्याने फार मोठा अनर्थ टळला यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. आगीचे वृत्त कळताच घटनास्थळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अर्चित चांडक यांचेसह बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत,सपोनि मंगेश गोटला तसेच पोलिस कर्मचारी यांनी धाव घेतली. सदर आग शॉकसर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनी झालेल्या घटनेची माहिती घेतली . बाजारपेठ पोलीस स्टेशनला आग लागल्या प्रकरणी अकस्मात आगीची नोंद प्रक्रिया रात्री उशिरा पर्यत सुरू होती .



