भुसावळ (प्रतिनिधी )-

दरवर्षी प्रमाणे वाणिज्य विभागा तर्फ 72 वा गणतंत्र दिवस पार्सल ऑफिस भुसावल मधे साजरा करण्यात आला. या वेळी वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक श्री युवराज पाटील यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले आणि महाप्रबंधक यांचा संदेश सर्व कर्मचाऱ्यांना वाचून दाखविण्यात आला. श्री युवराज पाटील यांनी रेल कर्मचाऱ्यांना 72 वा गणतंत्र दिवस शुभेच्छा दिल्या .
यावेळी मंडल वाणिज्य प्रबंधक श्री बी.अरुण कुमार, सहायक वाणिज्य प्रबंधक (माल) श्री अनिल बागले, सहायक वाणिज्य प्रबंधक(टी.जा.) श्री अनिल कुमार पाठक , मंडल वाणिज्य निरीशक संजय चापोरकर, राजशिष्टाचार अधिकारी श्री जीवन चौधरी,मुख्य वाणिज्य निरीशक सुदर्शन देशपांडे,आर डी क्षीरसागर,शैलेश पारे,प्रकाश ठाकूर,मुख्य पार्सल पर्यवेक्षक हितेंद्र आव्हाड , सर्व वाणिज्य कर्मचारी उपस्थित होते. या वेळी कोरोना संबंधित नियम पाळून गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला.


