भुसावळ (प्रतिनिधी ) –
जगभरातील बदलते आणि ढासळणारे हवामान पाहता, दावत-ए-इस्लामीहिंद ही धार्मिक आणि सामाजिक संघटना २० जुलै, २०२० पासून देशव्यापी वृक्ष लागवड मोहीम राबवित असून त्या अंतर्गत १२ दशलक्ष झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आले आहे परंतु कोरोना मुळे या मोहिमेत काही प्रमाणात घट झाली होती म्हणून प्रजासत्ताकदिन या दिवसाला वृक्षरोपण दिवस महणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व कमिटी कडून घेण्यात आले , त्याअंतर्गत आज संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यास सुरवात झाली आहे भुसावळ येथेही मुस्लिम कॉलनीती खुले भुखंड मध्ये श्री मंगेश गोटला, वरिष्ठ इन्स्पेक्टर, बाजार पेठ पोलिस स्टेशन भुसावळ तसेच नवयुक्त ग्रामसेवक रईस शेख, अमीर भाई, मुजीब भाई, सहिबा मेंबर, मौलाना जुल्फिकार मिसबाई साहिब, हाफिज मुंताझिर, कारी हसन अतारी, यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून
हाजी साबिर शेख, फिरोज शेख, अशरफ तडवी, नवीद खान, कलीम खान,शब्बीर ठेकेदार उपस्थित होते. जहांगीर शेख, फरीद शेख, युसूफ खान , सैय्यद इम्रान यांनी प्रयत्न केले अशी माहिती रफिक रोशन कादरी मीडिया विभाग दावते इस्लामी हिंद भुसावळ
यांनी कळविले .



