भुसावळ (प्रतिनिधी )-
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मंगळवार, 26 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शहरात जुने सातारे भागातील दीपक धांडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व जेष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख तथा आ. चंद्रकांत पाटील, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, आ. लता सोनवणे, भुसावळ विधानसभा संपर्क प्रमुख विश्राम साळवी, माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र दायमा, माजी आ.दिलीप भोळे, माजी जिल्हा प्रमुख अॅड. जगदीश कापडे उपस्थित राहतील.
उपस्थितीचे आवाहन आयोजक दिपक धांडे , सौ शारदा धांडे, देवेंद्र पाटिल, एडव्होकेट नरेंद्र लोखंडे, हेमंत चौधरीं राकेश खरारे, स्वप्निल सावळे, गोकुळ बाविस्कर, पिंटू भोई, अमोल पाटिल , चेतन भोई यांनी केले आहे .



