लालसरी बदकाला हतनूर जलाशयाचा मानपक्षी जाहीर करावा – चातक निसर्ग संवर्धन संस्थेची मागणी ;


भुसावळ (प्रतिनिधी )- –
तालुक्यातील वरणगाव नजिक असलेल्या हतनूर जलाशयावर हिवाळ्याच्या महिन्यांत दरवर्षी परदेशी पाहुणे पक्षी दाखल होतात. चातक निसर्ग संस्थेकडून येणार्‍या सर्व पक्ष्यांच्या नोंदी ठेवल्या जातात. जलाशयावर युरोपमधून मोठ्या लालसरी बदकांची संख्या जास्त असल्याने हतनूर धरण जलाशयाचा मोठ्या लालसरी बदकाला मानपक्षी जाहीर करण्यात यावा, अशी मागणी चातक निसर्ग संवर्धन संस्थेकडून करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यातील जैवविविधतेने असलेले हतनूर जलाशयाला लालसरी बदकाला मानपक्षी जाहिर केल्यास महाराष्ट्रात जलशयाची नवीन ओळख तयार होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *