भुसावळात मुकादमासह चौघे स्वच्छता कर्मचारी निलंबीत ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मुख्याधिकार्‍यांच्या सरप्राईज व्हिजीटमध्ये कामावर हजर नसतांना चार कर्मचार्‍यांनी हजेरी लावल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आल्यानंतर या प्रकाराला सहाय्य करणार्‍या मुकादमासह तिघा कर्मचार्‍यांना मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी निलंबीत केल्याने पालिकेतील स्वच्छता कर्मचार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
शहरातील अनेक भागातील स्वच्छता कर्मचारी येत नसल्याच्या तक्रारी मुख्याधिकार्‍यांकडे आल्या होत्या शिवाय या कर्मचार्‍यांनी आपल्या जागेवर रोजंदारीवर नोकर ठेवून स्वत: कामावर येणे टाळल्याची ओरड होत असताना मुख्याधिकार्‍यांनी शुक्रवारी तक्रारींच्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता प्रभारी आरोग्य अधिकारी प्रदीप पवार, निरीक्षक व्ही.सी.राठोड यांच्यासोबत भेट दिली. या पाहणीत संबंधीत मुकादमने तीन कर्मचारी कामावर हजर नसतानाही त्यांची हजेरी लावल्याचे आढळल्याने मुकादम व तिन्ही कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
शहरातील अनेक भागात स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी येतात शिवाय मुकादमाला हाताशी धरून काही कर्मचारी हजेरी लावतात मात्र यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही शिवाय अचानक सरप्राईज व्हिजीट करून कामावर नसलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकार्‍यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *